कोकण भवन येथे ध्वजारोहण

| नवी मुंबई | वार्ताहर |

कोकण भवन येथे विभागीय अप्पर आयुक्त किशन जावळे यांच्या हस्ते सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण झाले. या समारंभास नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

इमारतीच्या आवारात नवनवीन संकल्पनेतून आकर्षक असे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा संदेश देणारे रांगोळी, सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. कोकण भवन येथील माजी सैनिक संघटना यांच्यावतीने अमर जवान प्रतिकृती स्तंभ ठेवण्यात आले होते. विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन यांच्यावतीने मुख्य प्रवेशद्वारात उभारण्यात आलेला आजादी का अमृतमहोत्सव घरोघरी तिरंगा घोषवाक्य असलेला सेल्फी पॉईंट सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

Exit mobile version