पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात ध्वजारोहण

| अलिबाग | प्रतिनिधी |

भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात ध्वजारोहण समारंभ साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील पीएनपीच्या ग्रामीण भागातील विविध शाळां व कॉलेजमध्ये सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी गाबाजी गीते, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, पीएनपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राचार्य रविंद्र पाटील, बी. एड कॉलेजच्या प्राध्यापक रुतिषा पाटील, महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, मुख्य कार्यालयाचे लेखापाल अंकित भानुशाली, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, क्रीडा प्रशिक्षक तेजस म्हात्रे, अक्षय डाकी इतर मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्याविष्काराचे सादरीकरण केले.

Exit mobile version