रोहा बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे 12 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.यामुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा लागला आहे.

कृषी पतसंस्था व बहूउद्देशीय सहकारी संस्था या गटातून राजेश सानप ,विनायक धामणे ,राम गिजे, काशिनाथ भोईर,जयंत वाघ ,विशाल म्हात्रे, अनिल तवटे हे सर्वसाधारण गटातून तर महिला राखीव गटातून कांचन माळी, सपना मोहिते यांची तर भटक्या आणि विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून चंद्रकांत झोरे तर हमाल व मापाडी मतदारसंघातून रघुनाथ ठाकूर यांची तर ग्रामपंचायत मतदारसंघातून मनिषा घोगरे यांची अनुसूचित जमाती या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. या सर्वांचे पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील,जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील ,माजी आमदार पंडित पाटील तसेच महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रवादीचे महेंद्र पोटफोडे,विलास गुजर,अनिल काळे यांची व्यापारी मतदारसंघात तर आर्थिक दुर्बल मतदारसंघात नरेश वाघमारे यांची तर ग्रामपंचायत सर्वसाधारण या गटातून आतिष मोरे व ज्ञानेश्‍वर साळुंखे यांनी बिनविरोध निवड झाली आहे अशी माहिती शेकाप जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी यांनी दिली आहे.

Exit mobile version