बारणेंच्या रॅली दरम्यान झेंड्याला आग

| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान करण्यात आलेल्या फटाक्याणच्या आतशबाजी मुळे भगव्या झेंड्याला आग लागण्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि.28) कामोठे वसाहतीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेपूर्वी वसाहतीत बाईक रॅली काढण्यात आली होती वसाहती मधील एमएन आर चौकात रॅली आली असता उमेदवाराच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या फाटक्यांच्या आतशबाजी मुळे चौकात लावण्यात आलेल्या भल्यामोठ्या भगव्या झेंड्याला आग लागली.

Exit mobile version