| नागोठणे | प्रतिनिधी |
यावर्षीच्या पावसाळ्यात अंबा नदीला दोन वेळा पूर आला होता. या दोन्ही पुराच्या वेळी जनजीवन व येथील एस.टी. वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्यातच नागोठणे शहर व परिसरात गेले दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अंबा नदी पुन्हा एकदा तुडुंब भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि.18) दुपारपर्यंत अंबा नदीने धोक्याची पातळी गाठली नव्हती. मात्र, असे असले तरी सोमवारी दुपारी नागोठणे एस.टी. स्थानकाच्या मागील बाजूस अंबा नदीचे पाणी आले होते. तर अजूनही पावसाचा जोरही कायम असल्याने नागोठण्यात कधीही पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंत्रणेने नागरिकांना व दुकानदारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागोठण्याला पुराचा धोका
