कोसळलेली झाडे हटविली; नगरसेवक घरत यांचा पाठपुरावा

। पनवेल । वार्ताहर ।
सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे कामोठे वसाहतीमध्ये अनेक वृक्ष रस्तावर उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला होता . या वेळी माजी नगरसेवक विकास यांनी त्याठिकाणी जाऊन सदर पडलेली झाडे हटविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांशी सपंर्क साधून ती झाडे स्वतः जागेवर उभे राहून हटवून घेतली आहेत.

कामोठे वसाहतीमधील सेक्टर 34 स्वामी समर्थ मठ आणि सेक्टर 35 मध्ये अति पावसामुळे काही झाडे पडली होती याची माहिती स्थनिक रहिवाश्यांनी नगरसेवक विकास घरत यांना दिली त्यानुसार घरत यांनी त्वरित तेथे येईन पनवेल महानगरपालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधून स्वतः जाऊन ती झाडे रस्त्यातून काढून घेतल्याने याबद्दल स्थानिक रहिवाश्यांनी मा . नगरसेवक विकास घरत यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version