। पनवेल । वार्ताहर ।
गेल्या काही तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कामोठे वसाहतीमध्ये अनेक सखल भागात पाणी तुंबले होते. यावेळी स्थानिक नगरसेवक विकास घरत हे तत्परतेने रहिवाशांच्या मदतीला धावले.
अनेक ठिकाणी सिडकोच्या गलथान कारभारामुळे गटारे तुंबली होती. वाढत्या पावसाच्या जोरामुळे काही झाडे सुद्धा पडली होती .वाढत्या पावसाच्या प्रवाहामुळे अनेक गटारात पाणी तुंबून घाण रस्तावर आली होती त्यामुळे आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता अश्या वेळी नेहमीच मदतीला धावून जाणारे कामोठेवासियांचे हक्काचे नगरसेवक विकास घरत हे त्याच्या मदतीला धावून गेले रस्त्यावर उतरून त्यांनी वसाहतीची पाहणी केली व सर्व समस्या जाणून घेतल्या पाण्याचा प्रभाव वाढल्यास त्याला पर्याय म्हणून आवश्यक ती उपाय योजना केली . यावेळी विकास घरत यांच्या सोबत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नाना मुकादम आणि त्यांच्या सहकार्यांनी सुद्धा धाव घेऊन अनेकांना मदत केली. तसेच सिडको व महानगर पालिका अधिकारी वर्गाला तशी माहीती व आवश्यकता सूचना केल्या. यावेळी विकास घरत यांनी भयभीत नागरिकांना दिलासा देत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.