विमल बिडवे यांचे प्रतिपादन
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सुरक्षितेचे नियम पाळा आणि अपघात टाळा म्हणजेच रस्ता सुरक्षितेचे योग्य पालन केल्यास एकही अपघात होणार नाही, असे प्रतिपादन वाहतूक पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी केले. रविवार, दि. 29 रोजी ए-वन अपार्टमेंट असोसिएशन सोबत महिला व युवा मंडळ, दक्षिण मुखी श्री हनुमान मंदिर सेवा समिती, श्री गणेश उत्सव मंडळ, तुर्भे, नवी मुंबई यांच्या सहकार्याने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी असोसिएशनचे अध्यक्ष संजय खरोटे, सेविका कविता पाटील, सचिव जे. शिवया, सुवर्णा कदम, गवारे बाई यांच्या हस्ते दीप प्रज्ज्चलन करण्यात आले. पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह असोसिएशनचे अध्यक्ष संजय खरोटे व पदाधिकारी यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी, महिला मंडळ, युवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, नगरसेविका शुभांगी शशिकला पाटील यांनी आपल्या महानगरपालिका विभागात स्वच्छता मोहीम, नाले साफसफाई, आरोग्य, रस्ते विकास भविष्यासाठी वीज व पाण्याची बचत, ओला व सुका कचरा वेगळा करून कचरा गाडीत टाकणे आदी विषयावर भाष्य केले. यावेळी आयोजित हळदीकुंकू सोहळ्यास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महिलांसाठी बकेटबॉल, चमचा लिबू , संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन आले होते. लहान मुलांसाठी विविध खेळ स्पर्धा, जनरल नाँलेज प्रश्न मंजूषा तसेच विद्यार्थी गुणगौरव इ.कार्यक्रमाचे आयोजन करून बक्षीस वितरण करण्यात आले. आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल शिंदे यांनी, तर आभार असो.सचिव जे. शिवय्या यांनी मानले.