लोकसहभागातून बांधले वनराई बंधारे

। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यात महाबिज कंपनीने दहा हजार पिशव्या मोफत पुरविल्याने कृषी विभागाकडून लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यातील रहाटाड, मालुक, टोकार्डे, पढवण, साईधाम येथील नद्यांवर हे बंधारे बांधले गेले असुन या पाण्याच्या साठयामध्ये वाढ होऊन पाणी अडले असून हा पाणी साठा अधिक महीने टिकणार आहे. या पाण्याचा वापर हा गुरेढोरे यांना पिण्यासाठी होणार आहे. तर काही ठिकाणी कपडालत्ता धुण्यासाठी होणार आहे. काही गावातील मंडळी या पाण्यावर भाजीपाल्याची लागवड करून त्या भाजीचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी व विक्रीसाठी केला जाणार आहे. पाण्याचे महत्त्व त्याची अडवणूक व साठवण व भुगर्भातील पाणीसाठयात वाढ व पाणी साठविणे काळाची गरज हे महत्त्वाचे किती आहे याबाबत कृषी अधिकारी व कृषी सहायक यांनी गावकर्‍यांना समजावून सांगितले.याचे महत्त्व पटल्यानेच ग्रामस्थांनी आपल्या एकीच्या बळावर सहकार्य केल्यानेच हा प्रयोग यशस्वी झाला आहे. महाबीज कंपनीने अशीच मदत करावी अशी आशा देखील ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.

Exit mobile version