वन हक्क जागृती-सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन

| पेण | प्रतिनिधी |

शासनाने घोषित केलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा पाळण्या बरोबरच वन हक्ककायद्यांतर्गत आदिवासींना प्राप्त झालेल्या वन जमिनी बाबत प्रलंबित दावे, दळी जमीन, सामूहिक वन हक्क धान्य वितरण, जात दाखला, प्रधानमंत्री सन्मान किसान योजना, प्राप्त झालेल्या वन जमिनींची मोजणी व वारसनोंद याबाबत साकव संस्थेतर्फे जनजागृती व अमलबजावणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या संदर्भात साकव संस्थेने बुधवार दि. 28 सप्टेंबर रोजी बरडावाडी येथे आदिवासी वन हक्क व दळी धारक दावेदार आदिवासी दावेदारांचा प्रलंबित मागणी हक्क जागृती मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पेण तालुका उप विभागीय आधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार पेण, गट विकास आधिकारी, उप अधीक्षक भूमी अभिलेख, प्रकल्प आधिकारी आदिवासी विकास विभागतर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे.

तसेच रेशन कार्डधारक समस्या, जात दाखले प्राप्त झालेले वन दस्तऐवज, व प्राप्त झालेल्या वन जमिनींची मोजणीने झाल्याने या जमिनींच्या हद्दी निशाणासह या जमिनीचे नकाशे भूमी अभिलेखा कडून मिळालेले नाही. या जनजागृती मेळाव्याला पाबळ खोर्‍यातील वरप, पाबळ, जीर्णे, महालमिरा डोंगर ग्रामपंचायत क्षेत्रातील 29 वाडयांतील आदिवासी मोठ्या संखेने जमणार आहेत. या मेळाव्याला 52 दावेदार उपविभागीय आधिकारी इनामदार यांच्या हस्ते दस्तऐवज वाटप करण्यात येणार आहे.

Exit mobile version