नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची जंगल भ्रमंती

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।

जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्त फणसाड वन्यजीव अभयारण्यात मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील नूतन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जंगल भ्रमती करून जैवविवितेचा मनमुराद आनंद लुटला. सहाय्यक वन संरक्षक मनोहर दिवेकर, वनक्षेत्रपाल नारायण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सिंग कॉलेजच्या 48 विद्यार्थ्यांनी अभयारण्यात पायवाट तुडवीत इथल्या निसर्ग गाणी, बशी तलाव व निरीक्षणासाठी उभारलेले मनोर्‍यांना भेट देत वन्यप्राणी, पक्षी, किटक, कोळी, रंगी बेरंगी फुलपाखरे, बेडूक तसेच वृक्षांच्या विविध प्रजाती व वेली, रान फुलांची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. यावेळी ग्रीन वर्क्स ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी देशी व विदेशी पक्षांची शास्त्रोक्त माहिती दिली. तसेच, वनपाल आदेश पोकळ, वन संरक्षक अरुण पाटील व कर्मचारी वृदांनी विशेष सहकार्य केले.

Exit mobile version