गोखले महाविद्यालयात वन सप्ताह

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |

श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात वन सप्ताहा निमित्त, शनिवार दिनांक 08 जुन रोजी, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रसेवा समिती समन्वयक विभावरी करमरकर, प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास नाजुबेन काझी, श्रीवर्धनचे गटविकास अधिकारी, श्री. लेंडी, वन अधिकारी श्री.राऊत, प्रा. किशोर लहारे, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते.

Exit mobile version