| श्रीवर्धन | वार्ताहर |
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवार दि. 17 रोजी आंतरराष्ट्रीय न्याय दिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, महिला विकास मंच आणि विधी सेवा समिती व श्रीवर्धन वकील संघ यांच्या संयुक्तविद्यमाने महाविद्यालयाच्या प्रिं.टी.ए.कुलकर्णी सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी,प्रा.किशोर लहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून श्रीवर्धन न्यायालयाच्या न्यायाधीश सोनाली जवळगेकर व वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी ॲड.मालिका, ॲड. तन्वी जोशी, ॲड.जयदीप तांबुटकर, न्या.सोनाली जवळगेकर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास ॲड. आशिष वढावकर, ॲड. लाड, ॲड. अतुल चौगुले ,विद्यार्थी, स्वयंसेवक, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नवज्योत जावळेकर यांनी केले.