ओएनजीसीतर्फे वनीकरण

| उरण | वार्ताहर |

वीर वाजेकर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स उरण येथे 18 डिसेंबर रोजी ओएनजीसी उरण प्लांटने एनजीओ ग्रीन यात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने वनीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमा दरम्यान स्वयंसेवी संस्थेद्वारे एक जागरूकता प्रश्‍नमंजुषा देखील आयोजित करण्यात आली होती. 2000 रोपे कॉलेज कॅम्पसमध्ये 400 चौ.मी.च्या क्षेत्रात लावण्यात आली. यावेळी सुभोजित बोस ईडी-प्लांट मॅनेजर, श्री. पुगलेंधी, प्रमुख अभियंता सेवा, बिक्रम सिंग, हेड मेंटेनन्स आणि एस के आर्य, एचएसई प्रमुख यांनी महाविद्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी या उपक्रमात सहभाग घेतला होता.

Exit mobile version