बँक ऑफ महाराष्ट्राची फॉरेक्स सेवा पनवेलला सुरु

| पनवेल | वार्ताहर |
आपल्या बँकेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्राने फॉरेक्स केंद्राचा शुभारंभ नुकताच पनवेलला केला. याप्रसंगी प्रमुख अतिथी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त, विठ्ठल डाके, बँकेच्या महाप्रबंधक व नवी मुंबई झोनच्या झोनल मॅनेजर अपर्णा जोगळेकर, उप झोनल मॅनेजर सौरभ सिंग, सहाय्यक महाप्रबंधक व शाखा प्रबंधक, पिंकी राणी उपस्थित होत्या.

याप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त डाके म्हणाले की, बँकेच्या फॉरेक्स केंद्राला पनवेल व रायगड परिसरातील नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळेल व त्यांच्या व्यवसाय वाढीला चालना मिळेल. बँकेच्या ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी बँकेची प्रशंसा करून आभार मानले. ते पुढे म्हणाले की, बँक ऑफ महाराष्ट्रने पनवेलच्या शिरपेचात एक मनाचा तुरा खोवला आहे. ही खरोखर सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

याप्रसंगी पनवेलचे नामांकित उद्योजक मा. मंगेश परुळेकर जी सुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी फॉरेक्सच्या विविध उत्पादनांची माहिती पॉवर पॉईंटद्वारे उपस्थित ग्राहकांना देण्यात आली व उपस्थितांच्या शंकांचेसुद्धा समाधान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बँकेच्या अधिकारी केतकी जोशी यांनी केले. कार्यक्रमास ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Exit mobile version