गाडी घेऊन कुठेही जात असताना तुमच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन कार्ड तुम्ही सोबत नेले नसेल तर तुमचे चलन कापले जात होते. पण आता ही सगळी कागदपत्र सोबत बाळगायची अजिबात गरज नाही. मोटार वाहन कायदा-1989 मधील दुरुस्तीच्या आधारे केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार आता ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसीचे पुस्तक हातात घेऊन जाण्याची गरज नाही. त्याऐवजी तुम्ही ही कागदपत्रं एम परिवाहन मोबाईल ॲप मध्ये (mParivahan mobile app) साठवून ठेवू शकता. गरज पडल्यास आपण त्यांना अधिकाऱ्यांसमोर सादर करू शकता.
एम परिवाहन मोबाईल ॲप वर आपली कागदपत्र जोडण्याच्या स्टेप्स
1. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वरून एमपरिवहन ॲप (mParivahan mobile app) डाऊनलोड करा
2. तुमचा मोबाइल नंबर वापरून साइन अप करा. त्यानंतर ओटीपी मिळाल्यावर ॲपवर नोंदणी करा
3. दोन पर्याय तुमच्या समोर येतील – डीएल (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि RC (नोंदणी प्रमाणपत्र)
4. तुमचा डीएल नंबर प्रविष्ट करा
5. व्हर्च्युअल डीएल जनरेट करण्यासाठी, ‘Add to My Dashboard’ वर क्लिक करा
6. जन्मतारीख प्रविष्ट करा आणि आपला डीएल आपल्या डॅशबोर्डमध्ये जोडला जाईल.
असा वापरा ॲप
स्क्रीनच्या वरच्या बाजूला तुमचा व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स पाहण्यासाठी डॅशबोर्ड बटणावर क्लिक करा, एकदा क्लिक केल्यावर तुमच्या डीएल आणि क्यूआर कोडची संपूर्ण माहिती दिसेल. या कोडचा वापर अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची सर्व आवश्यक माहिती स्कॅन करून घेण्यासाठी केला जातो. आपण ॲपवर आपल्या वाहनांच्या आरसी बुकची माहिती देखील जोडू शकता.
फक्त एकच नाही तर वाहने जोडू शकता
एम.परिवाहन ॲपवर, व्यक्ती किंवा व्यक्तीद्वारे वापरली जाणारी अनेक वाहने जोडू शकता.
उदा- पत्नीने नोंदणी केलेले वाहन चालविणारा पती आपल्या ॲपमध्ये वाहनाचा तपशील देखील जोडू शकतो. त्याचप्रमाणे अनेक मोबाइल डिव्हाइसमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सचा तपशील जोडला जाऊ शकतो.