अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग उरण माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. आजच म्हणजे 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. मागील 3 ते 4 वर्षांपासून ते आजारी होते. त्यावेळच्या झिराड ग्रामपंचायतीचे सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि 2004 ते 2009 या काळात अलिबाग उरण मतदार संघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष , प्रदेश कॉग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.आज दुपारी 2 वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.