| अलिबाग | प्रतिनिधी |
राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अलिबागचे माजी नगरसेवक ॲड. सागर रामकृष्ण पाटील यांचे आज सकाळी निधन झाले. त्याच्यावर रामनाथ स्मशानभूमीत सकाळी साडेदहा वाजता अंत्यविधी करण्यात आले. गेली अनेक वर्षे ते काँग्रेस पक्षाचे काम करीत होते. अलिबाग मधील एका पतसंस्थेचे ते चेअरमन होते. गेली काही महिन्यांपासून त्यांच्या आजारपणावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
अलिबागचे माजी नगरसेवक ॲड. सागर पाटील यांचे निधन
