माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता

। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, परमबीर सिंह नेमके कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही.

यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान बुधवारी राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्यावरच्या कारवाईसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात परमबीर सिंह याच्यावर कारवाई न करण्याचं आश्‍वासन आता पाळलं जाण्याची शाश्‍वती देता येणार नाही, असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने पूर्ण केल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.

Exit mobile version