माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचे निधन

| मुंबई | वृत्‍तसंस्था |

माजी क्रिकेट पटू रोहित शर्मा यांचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले आहे. राजस्थान रणजी क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू रोहित शर्मा हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. प्रकृती खालावल्याने रोहित शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोहित शर्मावर यकृताशी संबंधित समस्यांवर उपचार सुरू होते.

राजस्थानच्या आक्रमक फलंदाजांमध्ये रोहित शर्माच्या नावाचा समावेश आहे. रोहित शर्मा आतापर्यंत राजस्थान रणजी संघाकडून 7 रणजी सामने खेळला आहे. याशिवाय यांनी 28 एकदिवसीय रणजी सामने आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. रोहित शर्मा यांची जयपूरमध्ये आरएस अकादमी नावाने क्रिकेट अकादमीही आहे. रोहित शर्मा यांनी अनेक रणजी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. रोहित यांच्या निधनामुळे राजस्थान क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version