डी.डी. नाईक यांच्या शोकसभेचे आयोजन

| अलिबाग | प्रतिनिधी |
माजी उपजिल्हाधिकारी डी.डी. नाईक यांचे वयाच्या 85 व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवशांती स्नेहालय व विरंगुळा केंद्र, निवृत्त शासकीय अधिकाऱ्यांचा संध्यानंद ग्रुप व ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागच्या वतीने श्रीबाग येथील सुयोग बंगल्याच्या भारती दीनानाथ तरे सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

रविवारी (26 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता या शोकसभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिवशांती स्नेहालय व विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष डॉ. सुभाष म्हात्रे, ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागचे अध्यक्ष प्रफुल्ल राऊत, उपाध्यक्ष चारुशिला कोरडे, सचिव यशवंत थळे, संचालक गजेंद्र दळी, नानासाहेब थोरात, आर.के. घरत, सुभाष क्षिरे, भारती दीनानाथ तरे, शरद कोरडे, ॲड. मनोज पडते, साहित्यिक उमाजी केळुसकर, अनुराधा क्षिरे, शांता अरविंदेकर, प्रणिता गुरव आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.

Exit mobile version