माजी जि. प. सदस्य सुरेश खैरे शेतीच्या कामात व्यस्त

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड तालुक्यात लावणीच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी जेवढा पाऊस आवश्यक आहे त्याप्रमाणात होत नाही तरी हंगामाचा विचार करून बळीराजा शेतात उतरला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी आपल्या शेतात नांगर धरून पारंपरिक पद्धतीने लावणीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या कृतीतून ते फक्त लोकनेतेच नाहीत तर उत्तम शेतकरी आहेत हे पण दाखवून दिले आहे. म्हणून त्याना लोक शेतकऱ्यांचे,कष्टकऱ्यांचे नेते म्हणून संबोधतात. कृषीवलने त्यांच्याबरोबर संवाद साधला असता ते असे म्हणाले की, मी दरवर्षी शेतात लावणीच्या कामात मजुरांबरोबर आवडीने सहभाग घेऊन काम करत असतो, त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा मनाला एक वेगळा आनंद मिळतो.

Exit mobile version