डंपिंग ग्राऊंडवर आग विझविण्याच्या प्रयत्नात माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक भाजले

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

गेल्या तीन-चार दिवसापासून अलिबाग डंपिंग ग्राऊंडवर लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असताना माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पायाला भाजल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अलिबागकर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपले लाडके तत्पर असलेले माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनीच पुढाकार घेतला. सकाळी 8.30 वाजल्यापासून डम्पिंग ग्राऊंडवर जाऊन आपले जेसीबी कामाला लावून कचऱ्याला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्यांचा पाय भाजला गेला होता. तरीही कसली तमा न कर्ता ते तिथे रात्री 9.30 पर्यंत उभे राहून काम करून घेत होते. त्यामुळेच त्यांच्या पायाला भाजलेल्याने फोड आले आहेत.

Exit mobile version