| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
माजी मंत्री आणि नवी मुंबईतील भाजपा नेते गणेश नाईक यांच्या विरोधात नवी मुंबईतील एका महिलेने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. गणेश नाईक हे या महिलेसोबत 27 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा खळबळजनक आरोप या महिलेने केला आहे. तिला आणि तिच्या मुलाला नाव मिळावे, यासाठी ही महिला पाठपुरावा करीत असुन तिला गणेश नाईक आणि त्यांच्या मुलाकडुन दमदाटी केली जात असल्याचे म्हटले आहे. आज या पीडित महिलेने तक्रार अर्ज सादर केला असुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिस विभागाला कारवाईच्या सुचना देण्यात आल्याची महिती अलिबागमध्ये बोलताना दिली .