माजी आमदार डी. एन. चौलकर यांना पत्नी वियोग

मुरूड जंजिरा | प्रतिनिधी |
मुरूडचे रहिवासी तथा काँगेसचे मालाड मतदार संघाचे माजी आमदार डी. एन. चौलकर यांच्या पत्नी सौ अंजना दत्तात्रेय चौलकर, यांचे गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने मुरूड येथील निवासस्थानी आकस्मिक निधन झाले. शेकापच्या चेंढरे येथील जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील यांच्या त्या मातोश्री तर माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्या त्या सासूबाई होत.
त्या 76 वर्षांच्या होत्या.त्यांचे माहेर बोरिवली येथील आहे.चौलकर यांच्या राजकीय आणि आमदारकीच्या काळात त्यांनी डी एन चौलकर यांना मोलाची साथ देऊन घरातील जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली होती त्यांचा स्वभाव गोड आणि सतत हसत मुख होता.त्यांच्या पश्चात 4 मुली आणि पती असा परिवार आहे.शुक्रवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर मुरूड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version