| धुळे | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. निधनसमयी ते 55 वर्षांचे होते. राजीव देशमुख यांच्या निधनामुळे राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. राजू देशमुख हे चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार होते, 2009 ते 2014 या कार्यकाळात राजू देशमुख हे विधानसभेचे सदस्य होते, मात्र त्यानंतर 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अशी राजीव देशमुख यांची ओळख होती. राजीव देशमुख अचानक अस्वस्थ जाणवू लागल्यानं धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी आपल्या नेतृत्वानं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष होते, तसेच 2009 ते 2014 या कार्यकाळात राजू देशमुख हे विधानसभेचे सदस्य देखील होते.







