| इस्लामाबाद | वृत्तसंस्था |
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इस्लामाबाद येथील एका न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. इम्रान खान यांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक करण्यात आली असल्याचा दावा इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने केला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर इम्रान यांची राजकीय कारकीर्द अडचणीत आली आहे. पुढील 5 वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. इस्लामाबाद पोलिसांनी इम्रानविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.