कोकणचे ‘कोकणपण’ टिकवूनच विकास करा

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे आवाहन
‘कोकणचा शाश्‍वत विकास’ या परिसंवादाला चांगला प्रतिसाद
रत्नागिरी | प्रतिनिधी |
विकास करताना ङ्गकोकणचे कोकणपण टिकवून ठेवा.कोकणी माणूस विकासाच्या ध्येय्याने झपाटलेला आहे.या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे.नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे.सरकारी विकास मर्यादित असतो.भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासदेखील झाला पाहिजेफ,असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
कै.कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित कोकणचा शाश्‍वत विकास या दोन दिवसीय परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला.परिसंवादातील पहिले सत्र शनिवार 19 जून आणि दुसरे सत्र रविवारी 20 जून रोजी उत्साहात पार पडले.या परिसंवादाचा समारोप सुरेश प्रभू यांनी केला.

पहिल्या दिवशी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत, दीपक गद्रे,प्रगतिशील शेतकरी विनायक महाजन,देसाई बंधू आंबेवाले उद्योगाचे संचालक जयंत देसाई,माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे,डॉ प्रकाश शिंगारे हे मान्यवर सहभागी झाले. दुसर्‍याा दिवशी कोकण भूमी प्रतिष्ठान चे संस्थापक संजय यादवराव, पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे,अभ्यासक डॉ दीपक आपटे,डॉ उमेश मुंडले हे मान्यवर सहभागी झाले. पर्यटन,पायाभूत सुविधा विकास, पर्यावरण व पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान चे मिहीर महाजन,दीपक महाजन यांनी संयोजन केले.ऋतुजा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.


नैसर्गिक साधन संपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे.मोठा पाऊस आपल्याबरोबर कस असलेली माती वाहून नेणार नाही,याकडे लक्ष दिले पाहिजे. काम करू इच्छिणार्‍या प्रत्येकाला पर्यटनातून काम मिळू शकते.सरकारी विकास मर्यादित असतो.भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासदेखील झाला पाहिजे.व्यक्ती आणि गाव एकत्र असले पाहिजे.संवादाला कृती कार्यक्रमाची जोड देऊया.
सुरेश प्रभू, माजी केंद्रीय मंत्री

Exit mobile version