| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
दोन आठवड्यांपूर्वी फोर्टि फाईड तांदूळ जप्त केल्याप्रकरणी शिवप्रसाद सरोज आणि जय आनंद फूड इंडस्ट्रीजचे मालक लखन पटेल यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आणखी तांदूळ जप्त करत कारवाई केली आहे. पनवेल तालुक्यातील आजीवली प्रीती सिएफएस मधून 133 टन माल जप्त करण्यात आला असून जय आनंद फूड येथून देखील 25 लाखांचा फोर्टिफाईड तांदूळ जप्त केला असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली. त्यानंतर कंपनी सील करण्यात आली आहे. याप्रकरणी 2 आरोपींचा शोध सुरू असून संतोष सिंग कंपनी व्यवस्थापक याला आरोपी करण्यात आले आहे. तर लखन पटेल याच्याविरोधात यापूर्वी देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.