गडकिल्ल्यांना महामार्गांशी जोडणार

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील गडकिल्ले आणि ऐतिहासिक वारसा स्थळांना चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‌‘फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर’ ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या माध्यमातून मुख्य महामार्गांपासून थेट किल्ल्यांपर्यंत दर्जेदार रस्ते उभारले जाणार असून, रायगड हा या प्रकल्पाचा केंद्रबिंदू असणार आहे. या योजनेत रायगड, खांदेरी, लोहगड, राजगड, शिवनेरी, पन्हाळा, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, साल्हेर, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग अशा 11 किल्ल्यांचा समावेश आहे. प्रकल्पाच्या सविस्तर अहवालाचे काम सुरू असून, येत्या तीन ते चार महिन्यांत तो पूर्ण होण्याची शक्यता आहे. किल्ल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांसोबतच स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वाहनतळ आणि ऐतिहासिक माहिती देणारे फलक यांसारख्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. या प्रकल्पामुळे गड-किल्ले पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Exit mobile version