तोतया पोलीस अधिकार्‍यासह चौकडीला अटक

पाचाड येथे महाड पोलिसांची कारवाई
महाड | प्रतिनिधी |
पाचाड या गावांमध्ये येणाछया पर्यटकांची आणि शिवभक्तांची चौकशी करुन त्यांच्या कडून दंडाची रक्कम वसुल करणाछया तोतया पोलीस अधिकारी आणि त्याच्या चार साथीदांराना महाड तालुका पोलिसांनी रंगेहाथ पकडून गजाआड केले.

अंगावर पोलिसांची खाकी वर्दी परिधान करुन गाडीवर देखील पोलीस चिन्हाचा गैरवापर करीत राजरोज वावरत असलेल्या एका तरुण तोतया पोलिसाला आणि त्याच्या चार सहकार्‍यांना पोलिसांनी ताब्यांत घेतले आहे.रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावांमध्ये शनिवारी ही घटना घडली.शैलेश पाटील (रा.ठाणे,मुळ रा.धुळे)असे या तोतया पोलिसाचे नाव आहे. बत्तीस वर्षाचा हा तरुण आपल्या मित्रा बरोबर एमएच-15-एमएए / 7549 क्रमांकाच्या महेंद्रा टियुव्ही या गाडीतून आला होता.खांद्यावर मपोसे असा स्टीलचा बॅच,गाडीवर पोलिसांचे चिन्ह, इंग्रजीमध्ये पोलिस असल्याचा फलक,त्याने स्वत: अधिकार्‍याचा गणवेश परिधान केलेला अशा पोषाखात पाचाड नाक्यावर वहाने तपासण्याचा बहाण करीत होता.या कामामध्ये त्याच्या बरोबर असलेले चार साथीदार देखील मदत करीत होते.पाचाड नाका तपासणी दरम्यांन स्थानिक पोलिसांनी माहिती घेतली असता नाक्यावर वाहने तपासणी करणारा आणि रुबाबदार दिसणारा पोलिस अधिकारी तोतया असल्याचे तपासा मध्ये आढळून आले.त्यानंतर महाड पोलिसांनी शैलेश पाटील या तोतया पोलिस अधिकार्‍यासह त्याचा मदत करणारे रविंद्र साहेबराव पाटील रा.जळगाव,धन:श्याम पाटील रा.धुळे,अविनाश पाटील आणि समाधान पाटील रा.जळगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्ंयात आला आहे. या सर्वाची रवानगी तुरुंगा मध्ये करण्यांंत आली आहे.या प्रकरणी सहायक फौजदार ए.एस.साळवी तपास करीत आहेंत.

Exit mobile version