| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पारगाव शाखेतील सहाय्यक अभियंता अमित पाटोळे यांच्या कार्यक्षेत्रातील 34 ट्रान्सफॉर्मरपैकी 7 ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य चोरी झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना पनवेल शहर पोलिसांनी सराईत आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांना अटक करून एकूण 7 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केला. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. यावेळी पोलीस नाईक सम्राट डाकी यांना यास खबऱ्याकडून संबंधित आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार अमर मुस्ताक अहमद, शिवम अमरनाथ शर्मा, गणेश मनोज शाहू आणि आलोक अजय गौतम यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून अधिक चौकशी सुरू असून, त्यांच्या विरोधात परिसरात आणखी गुन्हे दाखल आहेत का, याचा तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत. तसेच, चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घरफोडी प्रकरणातील चौघांना अटक
