विषारी गवत खाल्ल्याने चार म्हशी दगावल्या

17 जनावरे बाधित

| नेरळ | प्रतिनिधी |

नेवाळी येथे हिरवा चारा खाल्ल्याने तेथील यशवंत भागित या शेतकर्‍याच्या 19 जनावरांना विषबाधा झाली. त्यातील चार दुभत्या म्हशींचा मृत्यू झाला आहे.

जनावरांसाठी हिरवा चारा मिळावा म्हणून भागित यांनी आपल्या शेतात मका, बाजरी तसेच अन्य प्रकारचा चारा यांची लागवड केली होती. शुक्रवारी त्यांच्या 19 जनावरांनी तो चारा खाल्ला. त्यानंतर काही मिनिटात काही जनावरे जमिनीवर कोसळली. त्यांनी तातडीने वाकस येथून पशुवैद्यकिय अधिकारी डॉ शशिकांत थोरात याना पाचारण केले.त्यांच्या मदतीला डॉ सागर कसबे, तसेच पशुधन विभागाचे चेतन लांघी आणि झगडे नेवाळी गावात आले. कोसळलेल्या जनावरांची तपासणी सुरू केली. पशू वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने सर्व जनावरांवर औषध उपचार सुरू केले आणि त्यामुळे अनेक जनावरे यांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र म्हशींचा अखेर मृत्यू झाला. म्हशींच्या मृत्यू मुळे दुग्ध शेतकरी यशवंत भागित यांचे तब्बल सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.मात्र शेतकरी भागित यांनी आपल्या जनावरांना हिरवा चारा मिळावा म्हणून आपल्या शेतात ज्वारी टाकली होती.त्या हिरव्या चार्‍यात विषारी द्रव्य तयार होत असते. ते विषारी द्रव्य ज्वारीच्या हिरव्या चार्‍या बरोबर खाल्याने 19 जनावरांना विषबाधा झाली आहे.शेतातील कोवळी ज्वारी खाल्ल्याने पशुधन यास मोठा धोका होऊ शकतो, असा निष्कर्ष पशुवैद्यकीय डॉक्टरांनी काढला.

शेतकर्‍यांनी हिरवा चारा हा जनावरांना खायला देताना तो कोवळा चारा खाण्यास घालू नये अशी सूचना शेतकर्‍यांना केली आहे. शेतकर्‍यांनी संतुलित आहार आणि चारा पाणी देताना काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

डॉ डी आर जाधव, तालुका पशुधन अधिकारी

माझी चार दुभती जनावरे ही चारा खाल्ल्याने मृत झाली असून आम्हाला शासनाने त्याबाबत नुकसान भरपाई द्यावी. चार म्हैशी मृत झाल्याने आता दूध कसे द्यायचे असा प्रश्‍न पडला.

यशवंत भागित – शेतकरी
Exit mobile version