। मुंबई । प्रतिनिधी ।
भायखळा (पूर्व) येथील सुपर बेकरीमध्ये सोमवारी (दि. 28) संध्याकाळी 5:20 वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत चार जण अडकून जखमी झाले. जयेश पारिख (46), जुबेर सिद्दिकी (25), जावेद मोहम्मद (23) आणि शहारीयार (36) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना तात्काळ नजीकच्या मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. जवानांनी सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवून आग संपूर्णपणे नियंत्रणात आणली.
आगीत चार जण होरपळले

fire isolated over black background