खोपोली | संतोषी म्हात्रे |
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर शुक्रवारी खंडाळा घाट उतारावर शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चार वाहनात विचित्र अपघात घडला. यात एका कारच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की पुणे बाजू कडून मुंबई कडे ट्रक ,स्कोडा, क्वालिस,आणि आर्टिका या चार वाहनांचा चुकीच्या पद्धतीने लेन कटिंग करून ओव्हरटेक करण्याचा नादात तीन कार व एक ट्रक अशा चार वाहनात हा अपघात घडला.यात आर्टिका कारचा चालक संजय सोनाजी वय 32 रा चेंबूर याचा ट्रक आत कार शिरल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर स्कोडा , कॉलिस या दोन कार मधील एकूण पाच जण जखमी झाले असून , त्या सर्व जखमींना तातडीने एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. चार ही अपघात ग्रस्त वाहने रस्त्यावर विचित्र स्थितीत आल्याने मुंबई लेन वरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. महामार्ग वाहतूक पोलीस , खोपोली पोलीस , देवदूत , महामार्ग सुरक्षा यंत्रणा व खोपोली आपत्कालीन मदतीसाठी सामाजिक गृप च्या सदस्यांनी सर्व मदतकार्य व अन्य उपाययोजना केल्या .