दिल्लीत बक्षिस वितरण
कर्जत | प्रतिनिधी |
रायगड जिह्यातील क वर्गात समावेश असलेली कर्जत नगरपरिषदेला कचरामुक्त शहर म्हणून 3 स्टार मिळाले होते.शनिवारी ( 20 नोव्हेंबर) दिल्ली येथे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील सन्मानित करण्यात आले.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभर स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत कचरा मुक्त शहर आणि त्यासाठी राबविलेले विशेष उपक्रम याची पाहणी करण्यात येते. यात कर्जत नगर परिषदेने केलेली कामगिरी उल्लेखनीय असल्याने त्याची दखल घेत कचरामुक्त शहर म्हणून 3 स्टारचे नामांकन देण्यात आले होते.
दिल्ली येथील विज्ञान भवन येथे कर्जत शहराला कचरामुक्त शहर म्हणून मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील आणि नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांना पारितोषिक देवून सन्मानीत करण्यात आले.हे पारितोषिक सर्व कर्जतकर यांच्या सहकार्यामुळे मिळाले आहे,खासदार श्रीरंग बारणे,आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी,उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल तसेच सर्व नगरसेवक आणि नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी यांच्या मेहनतीचं हे फळ आहे. येत्या स्वच्छ सर्वेक्षणात सुद्धा चांगली कामगिरी करू अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी दिली आहे.