। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या सर्कलजवळ एक इसम गावठी बनावटीचे 4 पिस्टल व चार जिवंत काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 ला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून गोपाल राजपाल भारद्वाज (वय 22, रा. नवोदय नगर, टेहरी, उत्तराखंड) याला अटक करण्यात आली आहे. एक इसम पाठीवर काळ्या रंगाची बॅग घेऊन रेल्वे स्टेशन कडून सर्कल कडे पायी चालत येत असताना दिसला. यावेळी तो इसम रीक्षेला हात करत होता. पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतले. त्याचे नाव गोपाल राज्यपाल भारद्वाज असे आहे. त्याच्या बॅगची पाहणी केली असता त्यात चार गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे मिळून आली. व खिशात मोबाईल सापडला. हे पिस्टल त्याने कुठे, कोणाला विक्री करणार होता याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.