चारचाकीवर वानरांचा हल्ला ;अपघातात दोघे बचावले

| उरण | वार्ताहर |

दिघाटी – चिरनेर रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या फोर व्हीलर गाडीवर दबा धरून बसलेल्या वानरांनी गाडीवर उड्या मारल्याची घटना शुक्रवारी ( दि19) दुपारच्या सत्रात इंद्रायणी वळण रस्त्यावर घडली आहे. या अपघातात भयभीत झालेल्या फोर व्हीलर गाडीतील चालकांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्याजवळील तलावात उड्या मारल्याने ते बचावले आहेत. मात्र एक वानर दगावला असल्याची माहिती मिळत आहे.

उरण व पनवेल तालुक्यातील दिघाटी, केळवणे,साई, पुनाडे, वशेणी, चिरनेर, कळंबुसरे, कोप्रोली, सारडे, आवरे, पिरकोण, विंधणे, दिघोडे, वेश्वी, चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील वन तसेच मालकीच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल, मातीचे उत्खनन सुरू आहे. त्यामुळे भयभीत झालेले वन प्राणी हे पाण्याच्या व अन्नाच्या शोधात गाव वस्तीत ये- जा करत आहेत. त्यात केळवणे, दिघाटी, कळंबुसरे, चिरनेर गावातील रहिवाशांच्या घरावर वानर हे हैदोस घालताना दिसत आहेत. दिघाटी – चिरनेर रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या फोर व्हीलर गाडीवर शुक्रवारी ( दि19)दबा धरून बसलेल्या वानरांनी उड्या मारल्याने भयभीत झालेल्या वाहन चालकांचा ताबा गाडीवरून सुटला, आणि सदर गाडी ही रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात कोसळणार तोच वाहन चालकांनी व सहकाऱ्यांनी रस्त्याजवळील तलावात उड्या मारल्याने ते बचावले आहेत. या अपघात वानर दगावला असल्याचे समजत आहे. तरी रात्री अपरात्री दिघाटी – चिरनेर रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे

Exit mobile version