अपघातात चार युवकांचा मृत्यू

| कराड | प्रतिनिधी |

कोल्हापूर येथील श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या सातारा जिल्ह्यातील युवकांच्या स्कॉर्पिओ गाडीचा पुणे-बंगळूर महामार्गावरील कराड शहराजवळील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या या अपघातात चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील सर्व युवक सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे रहिवासी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला असून त्यात स्कॉर्पिओचा चालक तेजस देशमुख (25) याच्यासह सागर निंबाळकर (23), सुयश चिंचकर (20) आणि रोहित धोत्रे (21) यांचा समावेश आहे, तर अपघातात ऋतुराज दुबळे (21), शंतनू शिंगाडे (20) आणि अमन तांबोळी (23) हे तिघे जखमी झाले आहेत.

Exit mobile version