। रेवदंडा । वार्ताहर ।
कोर्लई येथे घर खरेदी-विक्रीत फसवणूक करणार्या इस्टेट एजंटवर रेवदंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याप्रकरणी इस्टेट एजंटने केलेले अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने रेवदंडा पोलिसांनी त्यास अटक केली व मुरूड कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
मिलर रूबान रूझारिओ यांनी कोर्लईमधील इस्टेट एजंट रॉकी तोमास ग्रेसिएस यास कोर्लई येथील घर मिळकत क्रमांक 619/अ/2 व घर मिळकत खरेदी करण्यासाठी रेवदंडा अर्बन बँक येथून आरटीजीएसव्दारे एकूण पंधरा लाख पन्नास हजार रूपये दिले. मात्र, त्याने व्यवहारात फसवणूक केली.
याबाबत मिलर यांनी रॉकी विरोधात घर खरेदी व्यवहारात विश्वासघात व फसवणूक केल्या प्रकरणीत तक्रार केली होती. परंतु रॉकी तोमास ग्रेसिएस यांनी याबाबत उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर रेवदंडा पोलिसांनी त्यांस अटक केली.