। पनवेल । वार्ताहर ।
व्यवसायात गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि पैसे परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहवाज मतीन हसवारे हे खारघर, सेक्टर 8 येथे राहत असून, त्यांना ओळखीचे राहिल इस्माईल सोंडे आणि त्याचे मेव्हणे दिवाण मोटर्सचे मालक सलमान अनवर दिवाण आणि सुफियान अनवर दिवाण यांनी दिवाण मोटर्सच्या व्यवसायात गुंतवणूक करून त्यावर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि 56 लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर सलमान आणि सुफियान यांनी त्यांचे राहते घर खरेदी करून गुंतवणूक करण्यास सांगितली आणि त्यावर नफा मिळवून देतो व दिलेल्या रकमेच्या मोबदल्यात बांधत असलेल्या 10 माळ्याच्या टॉवरमध्ये पाच फ्लॅट देतो, असे सांगून 1 कोटी 3 लाख 30 हजार रुपये घेतले. असे एकूण मेहवाज यांच्याकडून 1 कोटी 59 लाख 30 हजार रुपये घेऊन ही रक्कम परत मागितली असता रक्कम न देता अंडरवर्ल्डमध्ये ओळख असून पैसे परत मागितले, तर मारून टाकू, अशी दमदाटी केली.
नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक
