तालुक्यातील १०० नर्सेसची फसवणूक

आ. जयंत पाटील यांची चौकशीची मागणी
| मुंबई | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील 100 नर्सेसकडून नोकरीचे आमिष दाखवून प्रत्येकी तीन लाख रुपये असे तीन कोटी रुपये गोळा करून त्यांची फसवणूक केली असून, या टोळीने राज्यभरातून 300 ते 400 कोटी लोकांकडून उकळले असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व नर्सेसना रायगड जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करण्यास सांगितले आहे. मुख्य म्हणजे, या टोळीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले असून, त्याची खोलवर चौकशी करावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिले की, याची खोलवर चौकशी करून या टोळीला जेरबंद केले जाईल. त्यांच्याकडून उकळलेले सर्व पैसे जप्त करून ज्या परिचारिकेकडून पैसे घेतले, ते त्यांना परत केले जातील, असेही गृहमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितले.

Exit mobile version