फ्लॅट देण्याच्या बहाण्याने महिलेची ६४ लाखांची फसवणूक; आरोपी गजाआड

। पनवेल । वार्ताहर ।

फ्लॅट देण्याच्या बहाण्याने पनवेल मधील एका महिलेची ६४ लाखांनीं फसवणूक केल्याची घटना घडली आहे. इरफान मेहबुबअली भोपाळी असे या इसमाचे नाव असून त्याने सदर महिलेला फ्लॅट आपल्याच मालकीचे आहे असे भासवून तिची ६४ लाखांनी फसवणूक केली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी इरफान याना अटक करून त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पनवेल मधील नसीमा अलताफ अधिकारी यांचे पती कुवेत येथे नोकरीस असून त्यांना पनवेल शहरातच 3BHK घर घ्यावयाचे होते. घर शोधत असताना त्यांना ओळखीच्या एका इसमाने उरण नाका येथील अभीदीप अपार्टमेंट मध्ये फ्लट नं. 207 व 208 हे एकत्र करून 03 बीएचके बनवलेले घर दाखवले. घराचे मुळ मालक इरफान मेहबुबअली भोपाळी यांनी नसीमा यांना संपर्क करून तो फ्लॅट देण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. नसीमा यांनी आपल्या बचतीचे व त्यांच्या पतीने कुवेत येथून पाठवलेले काही पैसे असे एकूण 57 लाख 50 हजार रुपये त्यांच्या बँकेत ट्रान्सफर केले. तसेच 6 लाख 70 रोख स्वरूपात असे एकुण 64 लाख 20 हजार देऊ केले.

त्यानंतर इरफान भोपाळी यांनी सदर फ्लॅटचा एमओयु तयार करून त्यावर दोघांच्या सहया झाल्या. त्यानंतर भोपाळी यांनी फ्लॅटचा कच्चा मसुदा तयार केला. तेव्हा त्यात त्याचा भाऊ रिझवान मेहबुबअली भोपाळी यांच्या नावे तयार केला. त्यावर नसीमा यांनी नावातील बदलाबाबत विचारणा केली असता फ्लॅट नं.२०७ हे त्यांच्या पत्नी तस्नीम इरफान भोपाळी यांचे नावे असुन फ्लट नं. 208 हा त्याचा भाऊ रिझवान मेहबुबअली भोपाळी याचे नावावर असल्याचे सांगितले. तर घर खरेदी करून देण्याची जबाबदारी त्यांची असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसातच घराचा खरेदी करार करून देतो असे सांगितले.

त्यानंतर नसीमा यांनी फ्लॅटचे खरेदी कराराबाबत वारंवार विचारणा केली असता त्याने विवीध कारणे सांगुन टाळाटाळ करू लागला. काही दिवसानंतर सदरचा फ्लॅट नसीमा यांना देणार नसुन पैसे चार दिवसात परत करतो असे सांगितले. त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच पोलीसात गेलात तरी चालेल मला काही फरक पडत नाही, असे सांगत धमकावले. तसेच नसीमा इरफान याचे कार्यालयात फ्लॅटचे रक्कमेबाबत विचारणा करण्यासाठी गेली असता तेथे त्यांना शिवीगाळ केली. अखेर इरफान भोपाळी आपली फसवणुक करत असल्याचे पटल्याने नसीमा यांनी त्याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी इरफान याला अटक करून त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अश्या प्रकारे अजूनही काही लोकांची फसवणूक इरफान यांने केल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला असून तक्रारदारांने पूढे येऊन निर्भय पणे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version