निवृत्त अधिकार्‍याला गंडा

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नेट बँकिंग बंद करण्यात येत असल्याची भीती दाखवून एका सायबर चोराने नेरूळ भागात राहणार्‍या रेल्वेच्या एका निवृत्त अधिकार्‍याच्या खात्यातून 50 हजार काढून घेतले आहेत. या प्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरूळ सेक्टर-58 भागात कुटुंबासह राहण्यास राहणारी पीडित व्यक्ती भारतीय रेल्वेमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. 28 नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर त्यांचे नेट बँकिंग बंद होणार असल्याने पॅन नंबर अपडेट करण्याबाबतचा मेसेजसह एक लिंक पाठवली होती. त्या लिंकवर माहिती पाठवल्यानंतर त्यांच्या खात्यातून 49500 रुपये रक्कम गेल्याचा मेसेज त्यांना आला. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर 14 डिसेंबर रोजी एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version