लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

मुरुड येथील आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

एका तरुणीशी इंस्टाग्रामवर ओळख होऊन लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित करून फसवणार्‍या मुलावर बलात्कराचा गुन्हा मुरुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबतचे सविस्तर वृत्त असे की, सदरची केस ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. मुलीची फसवणूक करणारा मुलगा हा मुरुड शहरातील दत्तवाडी परिसरातील असल्याने सदरची केस मुरुड पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. एका उत्तर भारतीय तरुणीची ओळख इंस्टाग्रामवरून होऊन त्यांचे प्रेम जुळले होते. मुरुड दत्तवाडी येथील आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत फिर्यादी तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच वेगवेगळी कारणे दाखवून पीडित तरुणीकडून 5 लाख 66 हजार 549 रुपये एवढी रक्कम उसनवारी म्हणून स्वीकारली. ही रक्कम परत मागितली असता आरोपीने तरुणीला शिवीगाळ करून असलेले अश्‍लील फोटो कुटुंबियांना पाठवण्याची धमकी दिली. याबाबत आरोपीवर मुरुड पोलीस ठाण्यात बलात्कराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत मुरुड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version