बोगस कस्टम अधिकार्‍याकडून लाखोंची फसवणूक

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ गावातील कळंब रस्त्यावर साई मंदिर परिसरात राहणार्‍या व्यक्तीची कस्टम अधिकारी असल्याचे भासवून लाखोंची फसवणूक केली आहे. तब्बल 48 लाख रुपये संबंधित व्यक्तीने त्या बोगस कस्टम अधिकार्‍याला ऑनलाईनद्वारे पाठवले आहेत. दरम्यान, बोगस कस्टम अधिकार्‍याला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीत नेरळ-कळंब रस्त्यावर साई मंदिर परिसरातील शीतला बंगला येथे राहणार्‍या व्यक्तीची नवी मुंबई घणसोली येथे वास्तव्यास असलेल्या अमोल विठोबा तोडकरी याच्यासोबत ओळख झाली. संबंधित अमोल तोडकर हा उरण येथे कस्टम अधिकारी असल्याचे भासवत होता. त्याचवेळी जेएनपीटी येथे कस्टमकडून पकडलेला किमती माल अल्प किमतीत मिळवून देतो असे भासवत होता. त्याच्या भूलथापांना बळी पडून नेरळ साई मंदिर येथील त्या व्यक्तीने मागील वर्षभरात तब्बल 48 लाख 34 हजार एवढी मोठी रक्कम अमोल तोडकरी यांच्या बँक खात्याने ऑनलाईनद्वारे वर्ग केली होती. त्या बदल्यात तोडकर हा नेरळ साई मंदिर येथील रहिवासी व्यक्तीला घरगुती वापराच्या इलेक्ट्रिनिक वस्तू, फ्रिज, वॉशिंग मशीन तसेच नवीन कार, क्रेन मोबाईल, 30 वस्तू, कमी किमतीत कस्टम गोडाऊनमधून काढून देतो असे सांगून फिर्यादींना वॉशिंग मशीन व आयफोन 14 देऊन विश्‍वास संपादन केला. मात्र, अन्य साहित्य देण्यात विलंब लावत होता. महागडी कार अल्प किमतीत मिळणार म्हणून आणखी पैसे गुंतवले आणि क्रेन, ओला स्कुटी तसेच इतर घरगुती साहित्य देतो असे सांगून त्या वस्तू मिळवून देत नव्हता.

शेवट या गुन्ह्यातील आरोपीस दिन. 1 ऑगस्ट रोजी 2.03 वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांचे मार्गदर्शन घेऊन महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे करीत आहेत.

Exit mobile version