मोफत रेशनच्या बहाण्याने वृद्धेची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |
दोन अनोळखी इसमांनी एका 62 वर्षीय वृद्ध महिलेस मोफत रेशन मिळवून देतो असे आमिष दाखवून तिच्याशी बोलण्याचा बहाणा करून तिच्याकडे असलेल्या कापडी पिशवीमधील पर्समध्ये ठेवलेले रोख रक्कम व सोन्याची चेन असा मिळून जवळपास 75 हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. जूबाई म्हात्रे (62 रा.धाकटा खांदा) या कर्नाळा सर्कल येथील रिक्षा स्टँण्ड जवळून व तेथून रुपाली टॉकीजकडे जाणार्या रस्त्यावरील येशीबाई मंदिरासमोरुन जात असताना त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम आले व त्यांनी फुकट रेशन मिळवून देतो असे त्यांना आमिष दाखवून मंदिराजवळ नेवून त्यांच्याशी बोलण्याचा बहाणा करून त्यांच्या हातातील पर्समध्ये असलेली रोख रक्कम व सोन्याची चेन असा मिळून 75 हजार रुपये किंमतीचा ऐवज लबाडीने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version