| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
लोन काढलेल्या रकमेपेक्षा अधिकचे रक्कम देण्याचे आश्वासन देऊन सहा जणांची 1 कोटी 35 लाख 31 हजार 490 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अमित अशोक शेट्टी (रा. सेक्टर आर टू माय गोपाळ सोसायटी वडघर) याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण कांबळे हे करंजाडे, सेक्टर 5 येथे राहात असून, त्यांची ओळख अमित अशोक शेट्टी यांच्याशी झाली. अमित शेट्टी यांनी त्याच्याकडे पैसे मागितले. पैसे दिल्यानंतर ते पैसे लगेच परत केल्याने त्यांचा व्यवहारावर विश्वास बसला. त्यानंतर अमित याने त्याच्याकडील चेक देऊन किरण यांच्या नावावर क्रोमा कामोठे येथून सॅमसंग कंपनीचा मोबाईल व आयफोन या वस्तू फायनान्स करून घेतल्या. त्या बदल्यात पाच लाखांचा चेक दिला. मोबाईलचे तीन हप्ते रेगुलर भरले. त्यानंतर जमिनीचे खोटे पेपर बनवले आणि किरण यांच्या नावावर ऑनलाईन पर्सनल लोन घेऊन पुन्हा नवीन मोबाईल विकत घेतले. त्या बदल्यात पंचवीस लाखांचा चेक दिला. किरण यांच्या पत्नीकडून तीन तोळ्याचे मंगळसूत्र घेतले आणि त्या बदल्यात पाच तोळ्याचे मंगळसूत्र आणून देतो असे सांगितले. मात्र, मंगळसूत्र दिले नाही. असे एकूण 11 लाख 98 हजार रुपयांचे वस्तू आणि लोन घेतले. अमित शेट्टी यांनी ते चेक वटवण्यास नकार देऊन त्या बदल्यात खरेदी केलेले आणि लोन काढलेल्या रकमेपेक्षा अधिकचे रक्कम देण्याचे आश्वासन दिले. तसेच पनवेल परिसरात प्लॉट खरेदी करून देतो असे आश्वासन देऊन किरण यांच्या नावावर वस्तू आणि पर्सनल लोन काढले. त्याने वस्तूचे आणि पर्सनल लोनचे हप्ते भरले नाही. म्हणून किरण याने अमित याला फोन केला असता त्यांनी उडवा उडविची उत्तरे दिली. यावेळी मेहराज सावरटकर, विष्णू साळवे, रुपेश राजे, हिरालाल पवार, गणेश गोसावी यांची देखील 1 कोटी 23 लाख 32 हजारांची फसवणूक केल्याचे त्यांना समजले.
एक कोटी 35 लाख 31 हजारांची फसवणूक

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809