सहा लाखांची फसवणूक

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

रोख रक्कम दिली तर त्या बदल्यात दुप्पटीने रोख रक्कम देईन असे सांगून एका इसमाची सहा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन पनवेल येथे राहणाऱ्या तक्रारदार ईसमाची एका मित्रासोबत मैत्री होती. त्याने माझ्या मित्राला रोख रक्कम दिलीस तर तो दुप्पटीने रोख रक्कम देईल असे त्यांना सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने त्याच्याजवळ असलेली सहा लाख रुपये रक्कम त्याला दिली. त्या बदल्यात आरोपीने तीन नोटांचे बंडल त्यांना दिले, दिलेल्या बंडलमध्ये वर खाली 500च्या खऱ्या नोटा लपवून ठेवल्या होत्या. तर आतमध्ये खेळण्यातील नोटा ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यानी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version