दोन लाख 34 हजार 400 रुपयांची फसवणूक

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

जुन्या मशीन पावडर कोटिंग करून देतो असे सांगून 2 लाख 34 हजार रुपये किमतीची फसवणूक झाल्याची घटना कळंबोली येथे घडली आहे. याप्रकरणी प्रशोध पाणीकर आणि यामिनी पाणीकर यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

खारघर सेक्टर 40 येथील अल्ताफ पठाण हे नवीन जिमच्या साहित्याच्या शोधात होते. यादरम्यान त्यांनी प्रशोध पाणीकर यांच्यावर फोनवर बोलणे केले. यावेळी जुन्या 15 मशीनपैकी 7 मशीन बदलून नवीन देणार आणि उर्वरित 8 मशीन पावडर कोटिंग करून देणार असल्याचे ठरले. यावेळी बिग बॉय फिटनेस नावाची कंपनी असल्याचे खोटे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला आणि 2 लाख 34 हजार 400 रुपये रोखीने आणि ऑनलाईन स्वीकारले. मात्र, नवीन मशीन तसेच पावडर कोटिंग केलेल्या मशीन न देता फसवणूक केली.

Exit mobile version